तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात भरती निघाली आहे, ONGC Bharti 2025 साठी अधिकृत अशी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांना ओएनजीसी मध्ये नोकरी मिळवायचे आहे त्यांच्यासाठी ही एक चांगली बातमी आहे.
ऑनलाइन स्वरूपात अधिकृत वेबसाईटवरून फॉर्म भरायचा आहे, अर्जाची प्रक्रिया केवळ ऑनलाइन स्वरूपात असणार आहे ऑफलाईन अर्ज करण्याची सुविधा देण्यात आलेली नाहीये.
जे उमेदवारांनी पदव्युत्तर पदवी आणि इंजीनियरिंग पदवी पर्यंत शिक्षण घेतले आहे त्यांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. जिओलॉजिस्ट / जिओफिजीसिस्ट, असिस्टंट एक्झिक्यूटिव्ह इंजिनियर अशा दोन पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता किती आहे वयाची अट किती आहे अर्ज कसा करायचा याची सविस्तर अशी माहिती या आर्टिकल मध्ये मी दिलेली आहे कृपया भरतीची माहिती काळजीपूर्वक वाचून घ्या आणि नंतर फॉर्म भरा माहिती समजल्यावरच अर्ज सादर करा अन्यथा फॉर्म भरू नका कारण बर्यासाठी आणि शर्ती आहेत जेव्हा तुम्हाला सर्व अटी आणि शर्ती समजतील तेव्हाच फॉर्म भरा.
तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात जर तुम्हाला अर्ज करण्याची इच्छा असेल आणि नोकरी मिळवायची असेल तर ऑनलाईन स्वरूपात खाली जी अर्ज करण्याची प्रक्रिया दिलेली आहे त्याची पालन करून फॉर्म भरायचा आहे.
ऑनलाइन स्वरूपात फॉर्म भरायचा असल्याने तुम्हाला अर्ज कोठे पाठवण्याची गरज नाहीये, ओएनजीसीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन डायरेक्ट तुम्ही फॉर्म भरू शकता.
ओएनजीसी भरती 2025 साठी अर्ज हा तुम्हाला जर करायचा असेल तर तुम्ही ऑनलाईन अर्ज येथून करा या लिंक वर क्लिक करा.
लिंक वर क्लिक केल्यानंतर ओएनजीसी भरतीची अधिकृत रिक्रुटमेंट वेबसाईट ओपन होईल.
nats.education.gov.in असा या वेबसाईटचा युआरएल आहे, याच वेबसाईटवरून तुम्हाला ONGC Bharti साठी अर्ज करायचा आहे.
वेबसाईटवर गेल्यानंतर तिथे तुम्हाला सुरुवातीला तुमची नोंदणी करून घ्यायची आहे, नोंदणी करताना तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्यायची आहे.
नोंदी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ओएनजीसी भरतीसाठी अर्ज करण्याची लिंक दिसेल त्या लिंक वर क्लिक करायचा आहे.
त्यानंतर तुमच्यासमोर भरतीचा फॉर्म उघडेल त्या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती भरायची आहे.
वैयक्तिक माहिती बरोबरच तुम्हाला तुमची शैक्षणिक माहिती या सोबतच इतर आवश्यक माहिती देखील भरायचे आहे.
सोबतच जाहिरातीमध्ये सांगितल्याप्रमाणे फॉर्म भरताना आवश्यक असे सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायचे आहेत.
याचबरोबर तुम्हाला जाहिरातीमध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व सूचनांचे पालन करून योग्य प्रकारे फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरताना जर चूक झाली तर त्याची पूर्ण जबाबदारी उमेदवाराची असणार आहे त्यामुळे प्रत्येक माहिती काळजीपूर्वक आणि अचूक पद्धतीने भरून घ्या.
तुम्हाला या भरतीसाठी ठरवण्यात आलेली परीक्षा फी देखील ऑनलाइन स्वरूपात कोणत्याही पेमेंट मोड च्या माध्यमातून भरायचे आहे.
परीक्षा फी भरून झाली की नंतर भरतीचा फॉर्म सबमिट करायचा आहे, त्यानंतर एक पोज पावती ती पावती तुम्हाला सेव करायचे आहे शक्य असल्यास तुम्ही त्यांची प्रिंटआऊट देखील काढून घेऊ शकता अथवा त्याची मोबाईल मध्ये फोटो देखील काढली तरी चालेल.
पावतीवरील रजिस्ट्रेशन क्रमांक हा महत्त्वाचा असतो, परीक्षेची ऍडमिट कार्ड आल्यानंतर हा क्रमांक तुम्हाला हॉल तिकीट मिळवण्यासाठी गरजेचा असतो त्यामुळे रजिस्ट्रेशन क्रमांक काळजीपूर्वक जपून ठेवा.
ओएनजीसी भरतीची परीक्षा ही 23 फेब्रुवारी 2025 रोजी घेतले जाणार आहे, त्यासंबंधी एक्झाम डेट डिक्लेअर करण्यात आलेले आहेत. त्यामुळे सध्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख वाढवली जाणार नाही हे निश्चित आहे. त्यामुळे मुदतवाढ मिळेल या आशेने राहू नका सध्या संधी आहे तोपर्यंत अर्ज करून टाका.