महाराष्ट्र शासनाद्वारे शेतकऱ्यांसाठी Magel Tyala Solar Pump Yojana Maharashtra ही अभिनव अशी योजना सुरू केली आहे, या योजनेच्या माध्यमातून मागेल त्याला सोलार पंप मिळत आहेत
जे शेतकरी सोलर पंप मागतील त्यांना शासन सौर कृषी पंप उपलब्ध करून देत आहे. आजवर राज्यात लाखो शेतकऱ्यांनी Magel Tyala Solar चा लाभ घेतला आहे. त्यामुळे जर तुम्हाला पण या मागेल त्याला सोलार पंप योजना चा लाभ मिळवायचा असेल तर लगेच तुमचा देखील अर्ज सादर करा.
तब्बल 90 टक्के अनुदान सोलर पंपावर दिल जाणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी मोठी मदत याद्वारे सरकार करत आहे. मागेल त्याला सौर कृषी पंप योजना मध्ये शेतकऱ्यांना ऑनलाइन स्वरूपात अर्ज करून सोलर पंप मिळवता येतो.
यासाठी कोणते शेतकरी पात्र असणार, अटी आणि शर्ती काय आहेत, कागदपत्रे कोणती लागणार आहे, अर्ज कसा करायचा, अशी सर्व माहिती आर्टिकल मध्ये मी सांगणार आहे. माहिती खूप महत्त्वाची आहे त्यामुळे काळजीपूर्वक माहिती वाचा.
Magel Tyala Solar Pump Yojana Maharashtra
योजनेचे नाव | मागेल त्याला सौर कृषी पंप योजना |
सुरुवात | महाराष्ट्र शासन |
उद्देश | शेतकऱ्यांना अनुदानावर कृषी पंप पुरवणे |
सबसिडी | 90% |
लाभार्थी | महाराष्ट्रातील शेतकरी |
लाभ | सौर कृषी पंप संच |
हेल्पलाईन नंबर | 1800 233 3435 |
पात्रता निकष
- अर्जदार शेतकरी महाराष्ट्रातील रहिवासी असावेत.
- शेतकऱ्यांकडे स्वतःच्या नावे 2.5 एकर पेक्षा जास्त जमीन असावी.
- शेतीमध्ये पाण्याचा स्त्रोत असावा, बोरवेल, विहीर अथवा नदी.
- शेतकऱ्यांनी यापूर्वी सौर कृषी पंपासाठी अर्ज केलेला नसावा.
कोणते लाभ मिळणार?
- 90 टक्के अनुदानावर सौर कृषी पंप मिळणार.
- शेतकऱ्यांना फक्त 10 टक्के खर्च करायचा आहे.
- SC/ ST मागासवर्गीय शेतकऱ्यांना 95% अनुदान राहील.
- यासोबत शेतकऱ्यांना कृषी पंपावर विमा दिला जाईल, सोबत पाच वर्ष दुरुस्तीची हमी दिली जाईल.
- सौर कृषी पंपासाठी सरकारकडून मोफत वीज दिली जाईल.
- शेतकऱ्यांकडे असलेल्या जमिनीचे आकारानुसार त्यांना सौर कृषी पंप दिले जातील.
शेती नुसार सौर कृषी पंप
2.5 एकर जमीन | 3 HP चा सौर कृषी पंप |
2.5 ते 5 एकर जमीन | 5 HP चा सौर कृषी पंप |
5 एकर पेक्षा जास्त जमीन | 7.5 HP चा सौर कृषी पंप |
अनुदान किती आहे
सामान्य नागरिकांना सरकारद्वारे 90 टक्के अनुदान दिले जाते. तर मागासवर्गीय प्रवर्गातील एससी एसटी नागरिकांना 95 टक्के पर्यंत अनुदान दिले जाते, सामान्य नागरिकांपेक्षा पाच टक्के जास्त अनुदान मागासवर्गीय शेतकऱ्यांना मिळते.
सामान्य नागरिक | 90% अनुदान |
मागासवर्गीय SC/ ST | 95% अनुदान |
Magel Tyala Solar खर्च किती येणार
मागील त्याला सोलार द्वारे शेतकऱ्यांना सबसिडीवर पंप भेटणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना जास्त खर्च करण्याची गरज नाहीये.
लाडकी बहीण योजना नवीन अर्ज तिसरा टप्पा, येथून ऑनलाईन फॉर्म भरा
सामान्य नागरिकांना एकूण खर्चाच्या फक्त दहा टक्के रक्कम द्यावी लागणार आहे. तर मागासवर्गीय शेतकऱ्यांना एकूण खर्चाच्या फक्त पाच टक्के रक्कम द्यायची आहे.
सामान्य नागरिक | 10% |
मागासवर्गीय SC/ ST | 05% |
मागेल त्याला सोलार पंप योजना साठी आवश्यक कागदपत्रे
- सातबारा उतारा
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- पासपोर्ट फोटो
- जातीचे प्रमाणपत्र
- ना हरकत प्रमाणपत्र
असे सर्व कागदपत्रे तुम्हाला Magel Tyala Solar Pump Yojana साठी Online Apply करताना अपलोड करायचे आहेत.
सर्व कागदपत्रे चांगले क्लियर स्वरूपात स्कॅन करून घ्यायचे आहेत, पीडीएफ मध्ये फाईल सेव्ह करायचे आहे आणि त्यानंतर अर्ज जेव्हा केला जाईल तेव्हा फॉर्ममध्ये अपलोड करायचे आहेत.
Magel Tyala Solar Pump Yojana Apply Online
मागेल त्याला सोलार पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया:
- सुरुवातीला महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी महावितरण च्या @https://www.mahadiscom.in/solar_MTSKPY/ अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- महावितरणच्या मागेल त्याला सौर कृषी पंप या वेबसाईटवर आल्यानंतर तिथे तुम्हाला लाभार्थी सुविधांमध्ये अर्ज करा या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे.
- अर्जामध्ये तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती, जमिनीची माहिती, रहिवासी पत्ता, जलस्त्रोत, कृषीविषयक माहिती, बँक तपशील, घोषणापत्र हे सर्व माहिती भरायचे आहे त्यासोबत आवश्यक असे सर्व कागदपत्रे सबमिट करायचे आहेत.
- त्यानंतर अर्ज भरून झाल्यावर फॉर्म सबमिट करायचा आहे, फॉर्म सबमिट केल्यानंतर त्याची पोचपावती येईल ती पोचपावती तुम्हाला प्रिंट आऊट काढून घ्यायची आहे.
- पोच पावती वरील क्रमांक द्वारे तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती पाहू शकता, एकदा का तुमचा अर्ज मंजूर झाला की तुम्ही त्यानंतर मागील त्याला सौर कृषी पंपासाठी रक्कम भरून सौर पॅनल चा संपूर्ण संच आणि कृषी पंप मिळवू शकता.