सीमा रस्ते संघटना (BRO MSW Bharti 2025) विभागामध्ये भरती निघाली आहे यासंदर्भात बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन द्वारे अधिकृत अशी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला ऑफलाइन स्वरूपात अर्ज करता येणार आहे.
एकूण 411 रिक्त जागांसाठी ही भरती निघाली आहे, कुक, मेसन, ब्लॅक स्मित, मेस वेटर अशा चार पदांसाठी भरती असणार आहे.
अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे तुम्ही जर इच्छुक असाल तर तुम्ही देखील अर्ज करू शकणार आहात. सीमा रस्ते संघटना विभागाद्वारे जो पत्ता दिला आहे त्या पत्त्यावर फॉर्म पाठवायचा आहे, फॉर्म पाठवल्यानंतर तुमचा अर्ज स्वीकारला जाणार आहे.
दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2025 आहे. यावेळी मुदतवाढ मिळेल किंवा नाही याची शक्यता कमी आहे त्यामुळे 25 फेब्रुवारी अगोदर भरून घ्या.
Bro MSW Bharti 2025
भरतीचे नाव | Bro MSW Bharti 2025 |
एकूण रिक्त जागा | 411 |
शैक्षणिक पात्रता | 10 वी आणि ITI |
वयाची अट | 18 ते 25 वर्षे |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाईन |
परीक्षा फी | 50 रुपये |
पदाचे नाव आणि तपशील
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
MSW (कुक) | 153 |
MSW (मेसन) | 172 |
MSW (ब्लॅकस्मिथ) | 75 |
MSW (मेस वेटर) | 11 |
Total | 411 |
पदा नुसार शैक्षणिक पात्रता निकष
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
MSW (कुक) | 10वी उत्तीर्ण |
MSW (मेसन) | 10वी उत्तीर्ण आणि ITI (Building Construction/ Bricks Mason) |
MSW (ब्लॅकस्मिथ) | 10वी उत्तीर्ण आणि ITI (Blacksmith /Forge Technology/ Heat Transfer Technology/ Sheet Metal Worker) |
MSW (मेस वेटर) | 10वी उत्तीर्ण |
विभागानुसार शारीरिक पात्रता निकष
विभाग | उंची (सेमी) | छाती (सेमी) | वजन (Kg) |
---|---|---|---|
पश्चिम हिमालयी प्रदेश | 158 | 75 Cm + 5 Cm expansion | 47.5 |
पूर्वी हिमालयी प्रदेश | 152 | 75 Cm + 5 Cm expansion | 47.5 |
पश्चिम प्लेन क्षेत्र | 162.5 | 76 Cm + 5 Cm expansion | 50 |
पूर्व क्षेत्र | 157 | 75 Cm + 5 Cm expansion | 50 |
मध्य क्षेत्र | 157 | 75 Cm + 5 Cm expansion | 50 |
दक्षिणी क्षेत्र | 157 | 75 Cm + 5 Cm expansion | 50 |
गोरखास (भारतीय) | 152 | 75 Cm + 5 Cm expansion | 47.5 |
वयाची अट आणि शिथिलता
25 फेब्रुवारी 2025 रोजी उमेदवाराचे वय हे 18 ते 25 वर्षे असावे, वय जर कमी असेल किंवा मर्यादेपेक्षा जास्त असेल तर उमेदवार भरतीसाठी अपात्र ठरवला जाईल.
SC प्रवर्ग | 05 वर्षे सूट |
ST प्रवर्ग | 05 वर्षे सूट |
OBC प्रवर्ग | 03 वर्षे सूट |
परीक्षा फी आणि कास्ट नुसार सूट
General/OBC/EWS/ExSM या प्रवर्गातील उमेदवारांना केवळ परीक्षा फी भरावी लागणार आहे, बाकी इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना फी भरण्याची गरज नाही त्यांना फी मध्ये सूट देण्यात आली आहे.
General/OBC/EWS/ExSM प्रवर्ग | 50 रुपये फी |
SC/ST प्रवर्ग | फी नाही |
महत्वाच्या तारखा
अर्जाची सुरुवात | 14 जानेवारी 2025 |
अर्जाची Last Date | 25 फेब्रुवारी 2025 |
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात PDF | येथून वाचा |
भरतीचा फॉर्म | Download |
फी भरण्याची लिंक | येथून फी भरा |
How to apply for Bro MSW Bharti 2025
सीमा रस्ते संघटना विभागामध्ये भरती साठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑफलाईन स्वरूपात असणार आहे. अर्जदार उमेदवारांना खाली दिलेल्या स्टेप फॉलो करून फॉर्म भरावा लागणार आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता: Commandant GREF Centre, Dighi Camp, Pune-411015
- सुरुवातीला Bro MSW Bharti 2025 Notification PDF ला ओपन करा.
- जाहिरातीची लिंक वर महत्वाच्या लिंक्स या सेक्शन मध्ये दिली आहे.
- जाहिराती मध्ये खाली स्क्रोल करा, आणि फॉर्म ची प्रिंट आऊट काढून घ्या.
- फॉर्म मध्ये जी माहिती विचारली आहे ती सर्व माहिती बरोबर भरून घ्या.
- तुम्हाला कोणत्या पोस्ट साठी अर्ज करायचा आहे हे देखील फॉर्म मध्ये टाका, या सोबत तुमची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती देखील भरा.
- फॉर्म वर तुमचा एक पासपोर्ट फोटो चिकटवा, आणि फोटो वर तुमची सही करा.
- त्यानंतर आवश्यक ते कागदपत्रे Documents फॉर्म सोबत Hard Copy स्वरूपात जोडून घ्या.
- फॉर्म भरून Ready झाला की मग फी भरण्याची लिंक जी आपण वर दिली आहे त्यावर क्लिक करून Exam Fees भरून घ्या.
- त्यानंतर Bro MSW Bharti चा फॉर्म Commandant GREF Centre Pune येथे पोस्टाने पाठवा.
अशा प्रकारे तुम्ही सीमा रस्ते संघटना भरती साठी अर्ज करू शकता, अर्ज करण्याची प्रक्रिया ही खूप सोपी आहे.
एकदा का अर्ज अधिकृत पत्त्यावर पाठवला की मग @marvels.bro.gov.in द्वारे Exam Date जाहीर केल्यानंतर तुम्ही परीक्षा देऊन नोकरी मिळवू शकता.