Ladki Bahin Yojana 3.0 Registration: महिलांना मिळणार 2100 रुपये महिना, नवीन फॉर्म सुरू?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

लाडकी बहीण योजनेचे नवीन फॉर्म लवकरच सुरू होणार आहेत, Ladki Bahin Yojana 3.0 Registration सुरू करण्या संदर्भात महिला व बालविकास मंत्री अदिती सुनील तटकरे यांनी अधिकृत अशी घोषणा केली आहे.

Ladki Bahin Yojana 3.0 चा नवीन टप्पा सरकार लवकरच सुरू करणार आहे, तुम्ही जर Ladki Bahin Yojana साठी आगोदर फॉर्म भरला नसेल तर तुम्हाला या तिसऱ्या टप्प्यात अर्ज सादर करता येणार आहेत.

लाडकी बहीण योजनेचे नवीन फॉर्म केव्हा सुरू होणार? याची सविस्तर माहिती या आर्टिकल मध्ये देण्यात आली आहे. सोबतच या Ladki Bahin Yojana 3.0 मध्ये अर्ज कसा करायचा, प्रक्रिया स्टेप काय आहेत? नवीन निकष कोणते लावले आहेत? Ladki Bahin Yojana Apply Online साठी कोणते कोणते कागदपत्रे लागणार? अशी सर्व कामाची माहिती या पोस्ट मध्ये देण्यात आली आहे.

Ladki Bahin Yojana 3.0

योजनेचे नावलाडकी बहीण योजना
सुरुवाततत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
उद्देशमहिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे.
लाभार्थीमहाराष्ट्रातील महिला
लाभमहिना 1500 रुपये चालू (2100 रुपये मार्च नंतर)

Ladki Bahin Yojana 3.0 Registration

लाडकी बहीण योजना 3.0 टप्प्याचे फॉर्म लवकरच सुरू होणार आहेत, या संदर्भात अदिती तटकरे यांनी Hint दिली आहे. त्यामुळे त्यांच्या सांगण्यानुसार लवकरच लाडकी बहीण योजना नवीन फॉर्म सुरू होणार आहेत.

अदिती तटकरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती, त्या पत्रकार परिषदेत रिपोर्टर मार्फत Ladki Bahin Yojana 3.0 Registration संबंधी प्रश्न विचारण्यात आले होते. त्याच उत्तर देत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी अस सांगितलं आहे की आता Ladki Bahin Yojana 3.0 साठी मंत्रिमंडळात बैठक घेतली जाणार आहे, मंत्रिमंडळ निर्णयात मंजुरी मिळाल्यानंतर लाडकी बहीण योजना चे नवीन अर्ज सुरू केले जाणार आहेत.

लाडकी बहीण योजना नवीन फॉर्म केव्हा सुरू होणार?

सध्या राज्याची आर्थिक स्थिती नाजूक आहे, मागे तुम्ही बातमी पहिली असेल की लाडकी बहीण योजनेच्या हफ्त्या मुळे शिक्षकांचा पगार रोखला गेला होता.

आणि आता लाडकी बहीण योजना हफ्ता वाढ करण्याची मागणी पण खूप होत आहे, या सर्वांचा विचार करता लाडकी बहिण योजनेचे नवीन फॉर्म अद्याप तरी सुरू केले जाणार नाहीत.

मार्च मध्ये अर्थसंकल्प जाहीर केला जाणार आहे, त्यात लाडकी बहीण योजना संबंधी मोठ्या घोषणा केल्या जाणार आहेत. यावेळी मार्च महिन्यानंतर Ladki Bahin Yojana 3.0 Registration सुरू केले जाऊ शकतात.

Ladki Bahin Yojana 3.0 Required Documents

लाडकी बहीण योजनेचा नवीन फॉर्म सुरू झाला की तुम्हाला अर्ज करण्यासाठी काही कागदपत्रे द्यावे लागणार आहेत. त्याची लिस्ट खालील प्रमाणे आहे.

  • महिलेचे आधार कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • मतदान कार्ड
  • बँक पासबुक
  • पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड
  • लाडकी बहीण योजना हमीपत्र

Ladki Bahin Yojana 3.0 Eligibility Criteria

  • अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी.
  • महीलचे बँक खाते आधार कार्ड शी DBT Seeding झालेले असावे.
  • कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे 2,50,000 रुपये पेक्षा कमी असावे.
  • घरात कोणाकडेही चारचाकी गाडी वाहने नसावे. (ट्रॅक्टर सोडून)
  • महिलेचे वय हे 21 ते 65 वर्षे दरम्यान असावे.

Ladki Bahin Yojana 2025 Apply Online Process

Ladki bahin yojana 3.0 registation साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करू शकतात. त्यासाठी योजनेच्या @ladkibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यायची आहे.

योजेनचे पोर्टल आता नव्याने सुरू करण्यात आले आहे, त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाहीये.

Ladki bahin yojana official website वर गेल्यानंतर तिथे तुम्हाला तुमची नोंदणी करून घ्यायची आहे.

त्यानंतर Ladki Bahin Yojana 3.0 Registration साठी चा फॉर्म उघडेल, त्यात जी काही माहिती विचारली आहे ती तुम्हाला भरून घ्यायची आहे.

वर सांगितल्या प्रमाणे आवश्यक कागदपत्रे फॉर्म सोबत अपलोड करायचे आहेत. रेशन कार्ड, मतदान कार्ड, आधार कार्ड, हमीपत्र, बँक पासबुक, पासपोर्ट फोटो हे सर्व कागदपत्रे लागणार आहेत.

फॉर्म भरून झाला की मग तुम्हाला तो सबमिट बटणावर क्लिक करून सादर करायचा आहे.

अधिकारी तुमच्या फॉर्म ची तपासणी करतील, कागदपत्रे चेक करतील आणि जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला Approval देतील.

सूचना - अजून लाडकी बहीण योजनेचे फॉर्म सुरू झाले नाहीत. अर्ज करण्याची वरील प्रक्रिया तुम्हाला फॉर्म सुरू झाल्यावर कामी येणार आहे.

Ladki Bahin Yojana 3.0 Registration FAQ

लाडकी बहीण योजनेचे नवीन अर्ज केव्हा सुरू होतील?

लाडकी बहिणी योजनेची नवीन फॉर्म मार्चनंतर सुरू होण्याची शक्यता आहे, अजून काही अपडेट आलेली नाहीये.

लाडकी बहीण योजना 3.0 काय आहे?

Ladki Bahin Yojana 3.0 म्हणजे लाडकी बहीण योजनेचा तिसरा टप्पा, आगोदर फॉर्म भरण्याचे दोन टप्पे झाले आहेत आता या तिसऱ्या टप्प्यात उर्वरित महिलांचे अर्ज मागविण्यात येणार आहेत.

आगोदर Reject झालेले अर्ज पुन्हा करता येतील का?

एकदा फॉर्म Rejected झाले की नंतर ते पुन्हा Submit करता येत नाहीत. पण जर सरकारने अपात्र महिलांना संधी दिली तर या तिसऱ्या टप्प्यामध्ये रिजेक्ट झालेल्या महिलांना देखील पुन्हा अर्ज करता येईल.

लाडकी बहिण योजनेचा एकही हफ्ता आला नाही काय करावे?

अजून पण लाडकी बहिणी योजनेचा एक पण आमचा आला नसेल लाडकी बहिण योजना हेल्पलाइन वर तक्रार करू शकता.

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment